Nagar Ganeshotsav 2023 : संगमनेरमध्ये मानाच्या मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात

Nagar Ganeshotsav 2023 : संगमनेरमध्ये मानाच्या मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात
Published on
Updated on

संगमनेर(अहमदनगर) : संगमनेर शहरातील मानाचा पहिला गणपती असणाऱ्या सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणरायाची माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आबाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पो. नि भगवान मथुरे, सोमेश्वर मंडळाचे अध्यक्ष किशोर पवार यांच्या शुभहस्ते महाआरती आणि गणरायाचे पूजन करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

संगमनेर शहरातील रंगार गल्ली येथे सालाबादप्रमाणे यंदाही सोमेश्वर मित्र मंडळाच्या मानाच्या पहिल्या गणपतीची सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान मिरवणूक सुरू झाली. या मिरवणुकीत ढोल ताशा पथक, लाठी काठी, तलवार बाजी, नेमबाजी, साखळी कडे आधी प्रात्यक्षिकांच्या खेळाने संगमनेरकर चांगलेच भारावून गेले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांना सुद्धा लाठी काठी चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी सुद्धा लाठीकाठी चालवली. यावेळी संगमनेरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्या पाठोपाठ साळीवाडा मित्र मंडळ, नेहरू चौक मित्र मंडळ, चंद्रशेखर चौक मंडळ, माळीवाडा मित्र मंडळ, तानाजी चौक मित्र मंडळ, या 13 गणेश मंडळाची मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले. सायंकाळी बारा वाजता ही मिरवणूक संपणार आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चौख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news