राशीन : चिलवडी रस्त्यावरील खड्डे बुजवले

राशीन : चिलवडी रस्त्यावरील खड्डे बुजवले
Published on
Updated on

राशीन : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यातील राशीन- चिलवडी रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती. याबाबत दैनिक 'पुढारी'मध्ये 'राशीन-चिलवडी रस्त्याची दुरावस्था'या मधळ्या खाली बातमी प्रकाशित झाली होती. यामुळे बांधकाम विभाग खडबडून जागे झाले असून, तत्काळ हा रस्ता दुरूस्त केला आहे. यामुळे नागरिकांनी 'पुढारी'चे आभार मानले आहेत. दौंड – उस्मानाबाद राज्य मार्गाची राशीनमधील महात्मा फुले चौक ते चिलवडी दरम्यान अत्यंत दुरवस्था झाली होती. या ठिकाणाहून जाताना प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.

रस्त्यावर एक ते दोन फुटाचे भीषण खड्डे पडल्यामुळे दररोज लहान मोठ्या अपघाताचा प्रवाशांना सामना करावा लागत होता. या रस्त्याची दुरवस्था ही बातमी 'पुढारी'मध्ये नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून दौंड, पुणे, सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर या ठिकाणी जाणारे प्रवासी, परिसरातील चाकरमाने, नागरिक, दूध उत्पादक शेतकरी, तसेच शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थ्यांचा प्रवास सुखद झाला आहे.

परिसरातील ग्रामस्थ, तसेच दौंड – उस्मानाबाद रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी रस्त्याचे मोजमाप घेण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. लवकरच रस्त्याचे कामही सुरू होणार असून, त्यामुळे या रस्त्याची भाग्य उजळणार आहे. परिसरातील सर्व गावातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news