अल्पवयीन मुलाला फूस लावून अपहरण केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नेवासा पोलिसांनी गोव्यातील कोलवा बीच येथून अल्पवयीन मुलीसह अहरणकर्त्याला ताब्यात घेण्यात आले.
अलीम राजू शेख (वय 22, रा. आंतरवली, ता. नेवासा) असे आरोपीचे नाव आहे. नेवाशा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. ही गंभीर बाब असून, गुन्ह्याचा तत्काळ तपास करावा, अशा सूचना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नेवासा पोलिसांना दिल्या.
गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना आरोपीच्या मोबाईल लोकेशन गोवा येथे मिळाले. त्यानुसार पोलिस पथकाने गोवा येथे जाऊन कोलवा बीच वरून अल्पवयीन मुलगी व आरोपीला ताब्यात घेतले. दोघांना नेवासा पोलिस ठाण्यात आले. अल्पवयीन मुलीला आई वडिलांच्या ताब्यात दिले आणि आरोपीला नेवासे पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, पोलिस कर्मचारी दत्तात्रेय गव्हाणे, मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, सुरेश माळी, संदीप दरंदले, रवी सोनटक्के, फुरखान शेख यांच्या पथकाने केली.