नगर : भरधाव कार उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू

नगर : भरधाव कार उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद-बारामती राज्यमार्गावरील पाथर्डी तालुक्यातल्या खर्डा फाट्यावर कार उलटून चालकाचा मृत्यू झाला. तर, एकजण जखमी झाला आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.प्रदीप काकासाहेब खाटीक (वय 29, रा.पाथरवला, ता. नेवासा) असे अपघातात मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. जखमी विकास जावळे (रा.नागापूर, नगर) यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कैलास चेडे व गणेश नवले (रा.भेंडा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

मयत खाटिक यांच्यासह चौघेे रविवारी (दि.2) कारने बीड जिल्ह्यातील घोगस पारगाव येथे मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्न लावून परत आपल्या गावी दुपारी चार वाजता औरंगाबाद-बारामती राज्य मार्गावरून येत होते. पाथर्डी तालुक्यातल्या खर्डा फाट्यावर त्यांची स्विफ्ट कार (क्र. एम एच 12 जी एफ 8289) उलटली. या अपघातात खाटिक यांचे डोके वाहनाखाली सापडल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात माजी नगरसेवक नामदेव लबडे, शिवाजी सपकाळ यांनी मदत केली.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news