शिर्डीत गुरुपौर्णिमानिमित्ताने भाविकांची मांदियाळी | पुढारी

शिर्डीत गुरुपौर्णिमानिमित्ताने भाविकांची मांदियाळी

शिर्डी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : साईबाबांना गुरू मानून असंख्य भाविक शिर्डीत दाखल झाले असून आज पहाटेपासून बाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे. पिंपळवाडी रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिराच्या पुढे गर्दी गेली असून शिर्डी भाविकांनी अक्षरशः फुलून गेली. शिर्डीच्या साई मंदिरातील मुख्य उत्सवांपैकी महत्वाचा मानला जाणारा गुरुपौर्णिमा उत्सव असतो, या उत्सवाला रविवारी सुरुवात झाली. सोमवारी मुख्य दिवशी पालख्या दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे साई मंदिर परिसर गजबजून गेला आहे. भक्तनिवास, साई प्रसादालय, आणि शिर्डीचे रस्ते फुल्ल झाले आहे. मंदिर परिसर भाविक साईनामाचा सदोदित जयघोष करीत असल्याने सर्वदूर साईभक्तीचा मळा फुलताना पहावयला मिळाला.

प्रशासनाने साई सेवकांना या उत्सवात सेवा करण्याची संधी दिली. बरेचशे सेवक हे दर्शन बारीत सेवा करतांना दिसत होते. मंदिर परिसरात जागोजागी मोफत अन्नदानाचे मंडप दिसत होते. भाविक या प्रसादाचा लाभ घेत होते. तर लाडू प्रसाद, नास्ता पाकिटे घेण्यासाठी भाविकांनी साईनाथ मंगल कार्यालयात एकच गर्दी केली होती. आज रात्रभर मंदिर उघडे असल्यामुळे काही भाविक हे दर्शन घेऊन परतीच्या प्रवसाला निघतील. त्यासाठी बस स्थानकावरून ज्यादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. मात्र कालपासून शिर्डीत दाखल झालेले भाविक पहाटेपासून दर्शनासाठी लागले. त्यामुळे साधारणपणे साई कॉम्लेक्सच्या पुढे न जाणारी दर्शनबारी ही महालक्ष्मी मंदिराच्या पुढे गेली. मात्र मंदिर प्रशासनाने जागोजागी सुरक्षा रक्षक नेमलेली असल्यामुळे भाविक दर्शन बारीत पुढे जात होते.तरी दोन तास दर्शनासाठी लागत होते.

हे ही वाचा :

Ajit Pawar : अजित पवारांचं गुरुपौर्णिमेनिमित्तच ट्वीट आणि नेटीझन्सनी पाडला खोचक कमेंट्सचा पाऊस

पक्ष फुटला तरीही आम्ही लढत राहणार : रोहित पवार

Back to top button