नगर संघाचे पाऊल किताबाच्या दिशेने !

नगर संघाचे पाऊल किताबाच्या दिशेने !

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगरने नाशिक पुरुष संघाचा दाणदानीत पराभव करीत आपल्या विजयी किताबाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. बाद फेरीतील सामन्यांन्या तिसर्‍या दिवशी सुरुवात झाली. आज उपांत्य आणि अंतिम सामने खेळविले जाणार आहेत.
सायंकाळी राष्ट्रीगिताने बाद फेरीतील सामन्यांना सुरुवात करण्यात आली. रात्री उशापर्यंत पूर्व उपांत्य फेरीचे सामने सुरू होते. कालच्या साखळी सामन्या आपाल दबदबा निर्माण करत विजय संपादन केलेल्या नगरच्या पुरुष संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला. उपांत्यपूर्व फेरीत आज नाशिकच्या संघाशी सामना झाला.

यामध्ये पूर्वाधात 37-19 गुणांनी नाशिकवर आघाडी घेतली होती. उत्तरार्धात 27-17 गुणांनी आघाडी घेत नाशिकला 64-36 गुणांच्या फराकाने नमवित आपली विजयी घोडदौड सुरुच ठेवली. नगरकडून आदित्य शिंदे, सौरभ राऊत यांच्या चढाया, तर संघ नायक शंकर गदईच्या अष्टपैलू खेळाने हा विजय साकारला. नाशिकच्या आकाश शिंदे एकाकी लढत राहिला. वरिष्ठ गट पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नंदुरबार, कोल्हापूर, ठाणे, मुंबई उपनगर संघ महिलांत, तर सांगली, नाशिक, धुळे पुरुषांत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुणे, नाशिक, मुंबई शहर, पालघर यांनी महिलांत, तर नगर, नांदेड, मुंबई शहर, मुंबई उपनगर गट विजेते ठरल्याने ते थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले.

नगर जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनतर्फे वाडिया पार्क येथील मैदानावरी मॅटवर सामने सुरू आहेत. महिलांच्या पहिल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रथमच खेळणार्‍या नंदूरबारने धुळ्याचे आव्हान 30-15, असे संपुष्टात आणले. मध्यांतराला 17-07, अशी आघाडी घेणार्‍या नंदूरबारने नंतरही तोच पवित्रा घेत 15 गुणांच्या फरकाने सामना जिंकला.

दुसर्‍या सामन्यात कोल्हापूरने अत्यंत चुरशीच्या लढतीत रत्नागिरीचा प्रतिकार 35-23, असा मोडून काढला. पहिल्या डावात 12-14, अशा दोन गुणांनी पिछाडीवर पडलेल्या कोल्हापूरने दुसर्‍या डावात खेळ गतिमान करत हा विजय साकारला. स्नेहा शिंदे, गायत्री डोंगळे यांच्या चतुरस्त्र चढाया, स्नेहल डोंगळेने दिलेली पकडीची साथीमुळे सामना जिंकला. रत्नागिरीच्या सिद्धी चाळके, तसमीन बुरोंडकर यांचा पूर्वार्धातील खेळ उत्तरार्धात दुबळा ठरला. ठाण्याने नांदेडचा 73-17, असा धुव्वा उडवित उपांत्यपूर्व फेरी गाठली.

ठाण्याने सुरुवातीपासून झंजावाती खेळ करत पाऊण शतका जवळ गुणसंख्या नेली. माधुरी गवंडीचा अष्टपैलू खेळ तिला प्राजक्ता पुजारी, निकिता कदम यांची मिळालेली चढाई-पकडीची साथीमुळे सहज शक्य झाले. नांदेडच्या पल्लवी साळुंकेची सामन्यात चालली नाही. शेवटच्या सामन्यात मुंबई उपनगरने सायली जाधव, प्रणाली नागदेवता यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर रायगडला 39-21, असे नमविले. मध्यांतराला 26-10, अशी उपनगरकडे आघाडी होती. उत्तरार्धात राययगच्या ईशा पाटील, रश्मी पाटील यांचा खेळ बहरला. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने नंदूरबारला 44-33, असे रोखत आगेकूच केली. विश्रांतीला दोन्ही संघ 19-19, असे समान गुणांवर होते. विश्रांतीनंतर सांगलीच्या सौरभ कुलकर्णी, ओंकार इंजल यांनी गतिमान चढाया करत सामना आपल्या बाजूने झुकविला. त्यांना अक्षय निकमने भक्कम बचाव करत उत्तम साथ दिली. नंदूरबारकडून ऋषिकेश बनकर, निखिल शिंदे, राहुल ढोबळे यांनी बर्‍यापैकी लढत दिली. दुसर्‍या सामन्यात नाशिकने पुण्याला 43-41, असे नमवित क्रीडारसिकांना सुखद धक्का दिला. नाशिकला दुसर्‍या डावात विजयासाठी चांगलेच झुंजविले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news