आश्वी : सोयाबीनची चोरी करणारा गजाआड

आश्वी : सोयाबीनची चोरी करणारा गजाआड

आश्वी : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील शिबलापूर शिवारातून चोरी गेलेल्या सोयाबिनचा शोध घेण्यास आश्वी पोलिसांना यश आले. सुखदेव किसन पारधी (वय – 45, रा. कळस, ता. अकोले) याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून मुद्देमाल ही हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिबलापूर – पानोडी रस्त्यावर शेतकरी सीताराम नागरे यांची शेती व वस्ती आहे. सोयाबीनची काढणी केल्यानंतर त्यांनी गोण्यांमध्ये भरून वस्तीवरील शेडमध्ये ठेवली होती. मध्यरात्री चोरट्याने 36 हजार रुपये किमतीच्या 8 सोयाबीन गोण्या चोरुन नेल्या होत्या. या प्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवत माहिती घेण्याचे काम सुरु केले असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले होते. आरोपी हा नियमित या परिसरात येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानतंर पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पवार, पोना. शेख, विनोद गंभिरे, पो.कॉ. शिंदे, चालक झोडंगे यांच्या पथकाने आरोपीला अकोले येथून अटक केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news