नगर : मंगळवार बाजार परिसरात दगडफेक

नगर : मंगळवार बाजार परिसरात दगडफेक
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील मंगळवार बाजार परिसरात रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली. त्यात चारचाकी वाहनांचे तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत दोन तरुण जखमी झाल्याचे समजते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगविला. पतंग उडविण्यावरून वाद झाल्याचे समजले. मरकसंक्रातीनिमित्त आज शहरात सर्वत्र पतंग उत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी मंगळवार बाजार परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान दगडफेक झाली.

रस्त्यावर दगडांचा खच्च पडला होता. त्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही लोकांनी हत्याराचाही वापर केला. त्यात काही जण जखमी झाल्याचे समजते. दगडफेकीची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक खैरे, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्यानंतर जमाव पांगला. पोलिसांनी दगडफेक करणार्‍यांची शोध मोहीम सुरू केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news