टाकळीभान यात्रोत्सवात दगडफेक; यात्रेकरूंची पळापळ

टाकळीभान यात्रोत्सवात दगडफेक; यात्रेकरूंची पळापळ

टाकळीभान; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ग्रामदैवत महादेवाच्या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात रात्री 10. 30 च्या दरम्यान काही समाजकंटकांनी अंधाराचा फायदा घेत कार्यक्रम स्थळाच्या बाजूने दगडफेक केल्याने प्रेक्षकांची चांगलीच पळापळ झाली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी तातडीने दगडफेक करणार्‍यांना तत्काळ ताब्यात घेतले. मात्र या झालेल्या प्रकारामुळे यात्रोत्सवाला गालबोट लागले आहे.
टाकळीभान येथील शंभो महादेवाचा यात्रोत्सव दरवर्षी दिमाखात पार पाडला जातो. दोन दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवाची तयारी यात्रा

समिती महिनाभर मेहनत करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. खास महिलांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन केले जाते. कुस्तीचा हगामा मोठा होत असल्याने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामवंत मल्ल हजेरी लावून कुस्तीचा आखाडा गाजवतात.
यंदाही यात्रोत्सवानिमित्त कार्यक्रमाची रेलचेल होती. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस सुरू असलेल्या यात्रोत्सवात ऑर्केस्ट्रा सुरू असतानाच काही समाजकंटक प्रवृत्तींनी अंधाराचा फायदा घेत कार्यक्रम स्थळाकडे दगडफेक केल्याने पोलिस कर्मचारी, यात्रा कमेटी सदस्य, कलाकार व काही नागरिकांना मार लागल्याने जखमी झाले आहे.

बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी तातडीने या दगडफेक करणार्‍यांची धरपकड करून ताब्यात घेतले.
टाकळीभान पोलिस स्टेशनचे पो. हे. कॉ. रवींद्र सुखदेव पवार यांच्या फिर्यादिवरून दगडफेक धिंगाना घालणारे व पोलिसांना अरेरावी करणारे सोमनाथ लहानू गांगुर्डे, राहुल अशोक गांगुर्डे, बंडू लहानू गांगुर्डे, अविनाश राजू थोरात, संदीप चंद्रभान गांगुर्डे, सचिन नवनाथ बर्डे, सचिन बाबासाहेब बोरुडे, मंगेश बाळासाहेब पवार व इतर आठ ते दहा आरोपींना ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला, मुले झाले जखमी

दगडफेकीमुळे प्रेक्षकांची पळापळ झाल्याने काही महिला व मुलेही किरकोळ जखमी झाले आहेत. संपूर्ण यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमेटीचे सदस्य, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर व उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. दशरथ चौधरी, स.पो.नि. अतुल बोरसे व त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news