आज श्रीरामपूर बंदचे आवाहन; सर्वच एकवटले

आज श्रीरामपूर बंदचे आवाहन; सर्वच एकवटले
Published on
Updated on

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर जिल्हा व्हावा, या मागणीसाठी अनेक पक्षांसह व्यापारी, विविध संघटनांनी आज बंदची हाक दिलेली आहे. आजच्या बंदच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. राज्यात भौगोलिकदृष्या सर्वात मोठा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याचे नाव अग्रेसर आहे. शासकीय कामकाज सोयिस्कर व्हावे, यासाठी या जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी येथील जनतेने अनेक पक्षांच्या नेत्यांची मनधरणीही केली आहे.

परंतु श्रीरामपुरकरांच्या पदरी निराशाशिवाय काही मिळालेले नाही. शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी होणार असल्याचे नुकताच मंत्रीमंडळात निर्णय झालेला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अडगळीत पडलेला हा प्रश्नाने आता पुन्हा 'उचल' खाललेली आहे. या प्रश्नामध्ये आता राजकारणही सुरू झालेले आहे. त्यामुळे आज व्यापर्‍यांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविलेला आहे.

श्रीरामपूर जिल्हा व्हावा, असे सर्वांचेच मत आहे. परंतु शासकीय कामकाजा करीता एखादे कार्यालय शिर्डी येथे जणार असेल तर यामध्ये काही वावगे नाही. अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी येथे गेले तर श्रीरामपूर जिल्हा होणार नाही, असे कोणीही विचार करू नये, असे भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे यांनी सांगितले आहे. जिल्ह्या संदर्भात विरोधक केवळ कांगावा करीत आहेत.

दरम्यान, दुसरीकडे ससाणे समर्थकांसह इतरांनी श्रीरामपूर हाच जिल्ह्या व्हावा, यासाठी वज्रमुठ बांधलेली आहे. यासाठी आज श्रीरामपूर बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. या बंदला श्रीरामपूर मर्चंट असो. यांच्यासह श्रीरामपूर तालुका वकील संघ, बहुजन समाज पार्टी, लोकसेवा विकास आघाडी यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दर्शविलेला आहे.

श्रीरामपूर हेच सर्वार्थाने व सर्व निकषांचा विचार करता जिल्ह्याचे मुख्यालयासाठी योग्य आहे. तेव्हा जिल्हा विभाजन करुन श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा, या मागणीसाठी आजच्या बंदला आपला पाठींबा असून शहरासह तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सभागी व्हावे, असे आवाहन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले आहे. लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ व शहराध्यक्ष नाना पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सदरचे आवाहन करण्यात आले आहे. श्रीरामपूर हे जिल्ह्याचे ठिकाण सुरुवातीपासून ठरलेले आहे. असे पत्रकात म्हटले आहे.

अ.पोलिस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुरातच

अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय हे तात्पुरत्या स्वरूपात औद्योगिक वसाहत येथे शिफ्ट होणार आहे. जुन्या स्टेशन हनुमान मंदिरा समोरील जागेत नवीन इमारत बांधून सार्वजनिक बांधकाम विभाग व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाचे नव्याने बांधकाम होणार आहे. त्यामुळे हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात औद्योगिक वसाहत, नेवासा रोड, श्रीरामपूर येथे स्थलांतरित होणार आहे. हे कार्यालय श्रीरामपूर येथेच राहणार असून याबाबत काळजीचे कारण नसल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपकराव पटारे यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news