श्रीगोंदेकरांची प्रेरणा सायकल वारी

श्रीगोंदेकरांची प्रेरणा सायकल वारी

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने काम करीत असलेल्या श्रीगोंदा येथील अग्निपंख फौंडेशनने श्रीगोंदा ते मासाळवाडी (मोरगाव, ता. बारामती) ही 70 किलोमीटरची प्रेरणा सायकल वारी काढून मेंढपाळ कन्या, भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकरच्या जिद्द आणि नेत्रदीपक कामगिरीला सलाम केला. रेश्मा पुणेकर, तिचे आई-वडील व फिजिओथेरपिस्ट संतोष तांबे यांचा बारामतीचे पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, आदर्श उद्योजक राम कुतवळ, वृद्धेश्वर मल्टिीस्टेटचे अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे यांच्या हस्ते धनादेश व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेस्ट खेळाडू म्हणून सन्मानपत्र बहाल करून गौरव करण्यात आला.

यावेळी गणेश इंगळे म्हणाले, अग्निपंख फौंडेशन ही प्रेरणा सायकल वारी काढून, यशाचे शिखर गाठणारे खेळाडू, उद्योजक, समाजसेवक, शेतकरी यांचा सन्मान करीत आहे. ही खूप आदर्शवत बाब आहे. रेश्मा पुणेकर हिला सलाम करण्यासाठी काढलेली सायकल वारी तिला जागतिक बेसबॉल स्पर्धेसाठी हिंमत देणार आहे. राम कुतवळ म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांंमध्ये मोठी इच्छाशक्ती असते. फक्त त्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले, तर ते यशाचे शिखर निश्चित गाठतात. रेश्मा पुणेकर हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

रेश्मा पुणेकर म्हणाली, बारा वर्षांपासून बेसबॉलच्या मैदानात झुंजत आहे. माझी परिस्थिती नव्हती. मात्र, माझे गुरू आणि आई-वडिलांनी पाठीवर हात ठेवला, समाजानेही मदत केली. आता 2024 मध्ये कॅनडा येथे होणार्‍या जागतिक बेसबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. अग्निपंख फौंडेशनने सायकल वारी काढून माझ्या पंखांना बळ दिले आहे. यावेळी माजी सरपंच विश्वनाथ जगदाळे, ज्येष्ठ कवी हनुमंत चांदगुडे, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक राजेंद्र साळुंखे, लक्ष्मण साळवे, संतोष तांबे यांची भाषणे झाली. मिठू लंके यांनी प्रास्ताविक केले. शरद मचाले यांनी सूत्रसंचालन केले. दत्ताजी जगताप यांनी आभार मानले.

सहभागी सायकलपटू
दत्ताजी जगताप, नवनाथ दरेकर, देविदास खेतमाळीस, गोपाळराव डांगे, मिठू लंके, अ‍ॅड.संपतराव इधाटे, डॉ. अनिल शिंदे, सविता शिंदे, सुरेश खामकर, शैलेंद्र सांगळे, अनंत शिंदे, संकेत गांजुरे, मच्छिंद्र लोखंडे, प्रशांत एरंडे, दत्तात्रय हिरवे, भाऊसाहेब वाघ, किसन वर्‍हाडे, राजकिशोरी लांडगे, विठ्ठल निंबाळकर, मनिषा काकडे, बाळासाहेब काकडे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news