सोनई : पुढारी वृत्तसेवा : सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या पथकाने मटका व जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली. छाप्यात रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. सोनई येथील कौतुकी नदीपात्राजवळील एका टपरीच्या आडोशाला सुभाष पोपट साळवे (वय 43, रा. सोनई) याच्याकडून रोख 430 रुपये, कल्याण मटका जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुळा कारखान्यावरील एका टपरीच्या आडोशाला ज्ञानदेव विश्वनाथ धनगर (रा धनगरवाडी) यांच्याकडून 470 रुपये व कल्याण मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अकोलकर करीत आहेत.