संगमनेर उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी सोमनाथ वाघचौरे

संगमनेर उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी सोमनाथ वाघचौरे

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर उपविभागाच्या रिक्त असलेल्या पोलीस उपअधीक्षक पदावर अखेर खानदेशातील जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ उपविभागातून बदली होऊन आलेले तसेच अ. नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि श्रीरामपूर उपविभागामध्ये नोकरी करत असताना गुन्हेगारांचा कर्दन काळ ठरणारे सोमनाथ वाघचौरे यांची अखेर संगमनेर उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी वर्णी लागली आहे.

संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांची अमरावती विभागात अप्पर पोलीस अधीक्षक पदी बढती झाली त्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यापासून शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्याकडे संगमनेर उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. मात्र त्यांना शिर्डी आणि संगमनेर हे दोन्ही उपविभाग सांभाळताना खूप तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे संगमनेर उपविभाग हा पोलीस उपअधीक्षक विना वाऱ्यावर होता त्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावले जात होते.

नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि श्रीरामपूर या दोन उपविभागात अनेक वर्ष पोलीस उपअधीक्षक असताना सोमनाथ वाघचौरे यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले होत आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी त्यांची ओळख झाली होती काही वर्षांपूर्वी त्यांची खानदेशातील जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ उपविभागात बदली झाली होती.

गृहविभागाच्या वतीने नवीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात संगमनेर विभागाच्या अनेक दिवसा पासून रिक्त असलेल्या जागेवर गुन्हेगारांचा कर्दानकाळ असणारे सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर उपविभागात उपअधीक्षक पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून संगमनेर उपविभागात बोकाळलेली गुन्हेगारी आणि अवैध धंदे यांना पायबंद घालतात की येरे मागल्या असेच राहते का? याकडे आता संगमनेर उपविभागातील जनतेचे लक्ष लागले आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news