कोपरगाव : श्री गणेश कारखान्यास सहकार्य करणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

देवेंद्र फडणवीस ( संग्रहित छायाचित्र )
देवेंद्र फडणवीस ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहता तालुक्यातील श्री गणेश कारखाना या निवडूकीत कोल्हे – थोरात युतीने विखे गटाला धूळ चारत 18-1 अशा मोठ्या फरकाने ही निवडणूक एकतर्फी विजय खेचून आणला. त्याबद्दल नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याप्रसंगी चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व ज्यांच्या भोवती या निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला, अशी महत्वाची भूमिका पार पाडणारे युवानेते विवेक कोल्हे उपस्थीत होते.

नवनियुक्त संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट झाली असता सर्व संचालकांचे त्यांनी कौतुक करत अभिनंदन केले. सहकारात काम करताना पक्षविरहीत भूमिका ठेऊन भाजपा युती सरकार नेहमी आपल्या सोबत खंबीरपणे पाठीशी असणार आहे. शेतकरी कष्टकरी यांची कामधेनु असणारा कारखाना टिकला पाहिजे, या उदात्त हेतूेने झालेल्या या निवडुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. कोल्हे-थोरात युतीने विखे यांच्या होम ग्राउंडवर त्यांना पराभवाचा झटका दिला. यामुळे ही निवडणूक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे.

याप्रसंगी गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अ‍ॅड. नारायणराव कार्ले, डॉ. एकनाथ गोंदकर, नूतन संचालक बाबासाहेब डांगे, विजय दंडवते, संपत हिंगे, अनिल टिळेकर, बाळासाहेब चोळके, मधुकर सातव, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, सुधीर लहारे, अनिल गाढवे, विष्णुपंत शेळके, संपतराव चौधरी, आलेश कापसे, अरविंद फोपसे आदी उपस्थित होते.

विवेक कोल्हेंवर टाकली कौतुकाची थाप..!

अनेक काळ संकटातून जाणारा गणेश कारखाना सभासदांच्या भावनेचा आदर ठेऊन जनमताचा कौल कोल्हे यांच्या बाजूने देणारा ठरला. या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आगामी काळात श्री गणेश कारखाना जोमाने चालण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी पाठीशी असल्याचे सुतोवाच केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news