नगर : मोहटा गडावर शाकंभरी नवरात्रोत्सव

नगर : मोहटा गडावर शाकंभरी नवरात्रोत्सव

पाथर्डी तालुका ः पुढारी वृत्तसेवा :  श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर शुक्रवारी शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ करण्यात आला आहे. जगदंबा मोहटा देवीस गंगाजलाने अभिषेक करून, पुण्याहवाचन करण्यात आले. मोहटा देवस्थानचे विश्वस्त अक्षय गोसावी, आकांक्षा गोसावी या दामप्त्याच्या हस्ते देवीची महापुजा आरती करून शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. मोहटे येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मार्फत वासंतिक, शारदीय व शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. वरात्रोत्सव काळात त्रिकाल आरत्या, सुवासिनी पूजन, असे विविध कार्यक्रम घेण्यात येते.

देवस्थानचे पुजारी भूषण देवा साकरे ,भास्करदेवा देशपांडे, विकास क्षीरसागर यांनी पौरोहित्य केले. उत्सव काळात दररोज श्री दुर्गा सप्तशती पाठांचे वाचन होणार आहे. शुक्रवार दि. 6 जानेवारी 2023 रोजी शाकंभरी नवरात्र उत्सवाची सांगता होणार असून सकाळी 7 वाजता होमहवनास प्रारंभ होई. सकाळी साडे अकरा वाजता कुमारिका पूजन, महाआरती व पूर्णाहुती केली जाणार आहे
सायंकाळी सात वाजता महाआरती तर सायंकाळी महाप्रसादने सांगता होईल.पौर्णिमेनिमित्त रात्री 9 वाजता नामदेव महाराज बडे यांचे जाहीर हरिकीर्तनाचे आयोजन केले गेले आहे.भाविकांनी या पर्वकाळात देवी दर्शनाचा व विविध धार्मिक कार्यक्रमांचा साथरोगांच्या बाबतीत शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news