पाथर्डी : भाजप, मोदींच्या यशात ज्येष्ठांचे योगदान : आ. मोनिका राजळे

पाथर्डी : भाजप, मोदींच्या यशात ज्येष्ठांचे योगदान : आ. मोनिका राजळे

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या यशात ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान आहे. याची जाणीव ठेवून देशभर ज्येेष्ठ नागरिकांचा सन्मान केला जात आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. भाजपच्या पाथर्डी तालुका शाखेच्या वतीने शहरातील आप्पासाहेब राजळे सभागृहात मोदी 9 उपक्रमांतर्गत पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन झाले. यावेळी आमदार राजळे बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी माजी तालुकाध्यक्ष अशोक गर्जे होते व्यासपीठावर भाजपचे शेवगाव तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, बापूसाहेब भोसले, हिंदकुमार औटी, अ‍ॅड. दिनकरराव पालवे, विठ्ठल खेडकर, उद्धवराव वाघ, मिर्झा मनियार, अशोक चोरमले, आसराजी टकले, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, रामकिसन काकडे, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके आदी उपस्थित होते. माणिक खेडकर यांनी प्रास्ताविक केले. सचिन वायकर यांनी सूत्रसंचालन केले. अभय आव्हाड यांनी आभार मानले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

राजळेंच्या तोंडात साखर, डोक्यावर बर्फ

माजी तालुकाध्यक्ष अशोक गर्जे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या कामाची प्रशंसा करत, त्यांच्या तोंडात साखर, डोक्यावर बर्फ व पायाला भिंगरी आहे. त्या अत्यंत नम्र व शांत स्वभावाच्या असल्याने सर्वांना बरोबर घेऊन काम करतात.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news