संगमनेर : राष्ट्रवादी युवकचे टोल कंपनीसमोर उपोषण सुरू

संगमनेर : राष्ट्रवादी युवकचे टोल कंपनीसमोर उपोषण सुरू
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवून या महामार्गासह सर्विस रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी हिवरगाव पावसा टोल प्लाझा कंपनीसमोर संगमनेर शहर व तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने टोल कंपनीविरोधात घोषणाबाजी करीत आमरण उपोषण सुरू केले. उपोषणार्थी पदाधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कर्‍हे घाट ते आळेखिंड दरम्यान महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांनी अत्तापर्यंत अनेक निष्पाप प्रवाशांचा बळी घेतला.

अनेकजण अपंग होऊन घरात पडून आहेत. या प्रश्नाकडे हिवरगाव पावसा टोल प्लाझा कंपनी प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांचे लक्ष राहिले नाही. केवळ आंदोलने झाल्यानंतर थातूर-मातूर काम करीत मलमपट्टी करण्याचे काम हे दोन्ही विभाग करीत असल्यामुळे पुन्हा खड्डे जैसे थे होत आहेत. या महामार्गाची संपूर्ण दुरुस्ती करून डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात अनेकवेळा निवेदन देऊन, आंदोलने करूनही टोल प्लाझा कंपनी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही.

म्हणून या कंपनीविरोधात, महामार्गाच्या खड्ड्यांनी मृत पावलेल्या व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत धरून टोल प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, महामार्गावरील खड्डे ताबडतोब बुजविण्यास सुरुवात करावी, सर्विस रोड ताबडतोब व्यवस्थित करावेत, महामार्गावरील दिशादर्शक नाम फलक तत्काळ लावावे, वाढलेली झाडे तत्काळ तोडावी, स्थानिक वाहनांकडून टोल वसुली तत्काळ थांबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्याध्यक्ष अशोक काळे, अध्यक्ष अक्षय भालेराव, शहराध्यक्ष राहुल वर्पे, तालुका उपाध्यक्ष विकी पवार, नितीन आहिरे, प्रसाद काठे, शहर सरचिट णीस गजानन भोसले, किरण घोटेकर, मनीष माळवे आदिंनी टोल प्लाझा कंपनीसमोर उपोषण सुरू केले आहे.

'जोपर्यंत पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील निष्पाप प्रवाशांच्या बळीस कारणीभूत ठरणार्‍या हिवरगाव पावसा टोल प्लाझा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, सर्विस रस्त्यांची कामे सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही.
                                  – कपिल पवार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news