रोहित पवारांचं ‘एमआयडीसी’साठी पंतप्रधानांना पत्र

रोहित पवारांचं ‘एमआयडीसी’साठी पंतप्रधानांना पत्र
Published on
Updated on

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : वारंवार पाठपुरावा करून व मंत्र्यांच्या भेटी घेऊन, अधिवेशनातही 'एमआयडीसी' मंजुरीचा मुद्दा उपस्थित केला मात्र, प्रश्न मार्गी लागला नाही. यामुळे अखेर आमदार रोहित पवारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना नागरिक, युवकांतर्फे पत्र पाठविण्यात आले. ही पत्रे पंतप्रधान भवनमध्ये पाठविण्यात आली आहेत. 'एमआयडीसी' मंजुरीच्या मुद्याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले. त्यांनी याबाबत राज्य शासनाला मंजुरीसाठी निर्देश द्यावेत, अशी विनंतीही करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, दीपक शिंदे, कैलास शेवाळे, बाळासाहेब साळुंखे, सुनील शेलार, सतीश पाटील, संतोष मेहत्रे, किरण पाटील, रघुआबा काळदाते, बापुसाहेब काळदाते, विशाल मेहत्रे, नितीन धांडे, बाबासाहेब धांडे, देवा खरात, लालासाहेब शेळके, प्रसाद ढोकरीकर, भाऊसाहेब तोरडमल, विलास धांडे, भूषण ढेरे, संतोष वायकर संपत काळदाते, मधुकर काळदाते, श्रीमंत शेळके, अंगद रुपनर, प्राध्यापक प्रकाश धांडे, प्रतीक ढेरे, दीपक यादव, बाळासाहेब सपकाळ, रावसाहेब वाईकर, महादेव आखाडे, अशोक लांडघुले, स्वप्निल मोरे, ज्ञानदेव उबाळे, चंद्रकांत गोरे, दीपक बागडे, नागेश शेळके, भागवत काळदाते, किसन काळदाते, समशेर शेख आदी उपस्थित होते.

शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये आमदार रोहित पवार यांनी स्वतः लिहिलेले पत्र मतदार संघातील नागरिक व युवकांच्या उपस्थितीत पंतप्रधान कार्यालयाला पाठविले आहे. यावर आता पंतप्रधान कार्यालयाकडून काय उत्तर मिळणार? पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आमदार रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेड मतदार संघातील युवकांसाठी 'एमआयडीसी' व्हावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, मात्र आमदार राम शिंदे ही 'एमआयडीसी' होऊ नये म्हणून राज्याचे उद्योग मंत्र्यदांवर दबाव आणत आहेत. केंद्र सरकारचे धोरण युवकांसाठी आहे.

मतदार संघातील युवकांसाठी 'एमआयडीसी' होण्यासाठी आपण संबंधीत व्यक्तींना सांगावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
रघुआबा काळदाते म्हणाली, चिंचोली माळ, जळगाव, खंडाळा, पाटेगाव, पाटेवाडी व निमगाव या सह परिसरातील 22 गावे पूर्ण अविकसित आहेत. पाण्याची कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाही, जर या ठिकाणी 'एमआयडीसी' झाली तर त्याचा फायदा या गावांना होणार आहे. आता, यासाठी रस्त्यावर उतरून, असा इशारा काळदाते यांनी दिला.

ग्रामसभेची चुकीची माहिती : शेवाळे

कैलास शेवाळे म्हणाले, आमदार राम शिंदे यांनी पाटेगाव ग्रामसभेची चुकीची माहिती मीडियासमोर दिली. आम्ही या ग्रामसभेमध्ये स्पष्टपणे म्हटले की, बागायत क्षेत्रामध्ये व रहिवासी क्षेत्रामध्ये 'एमआयडीसी' होऊ नये, परिसरामध्ये असणार्‍या पडीक माळरानावर व्हावी. यामुळे राम शिंदे यांनी जनतेची दिशाभूल करू नये.

'तो' व्यवहार शिंदेंच्याच काळात : पाटील

किरण पाटील म्हणाले, निरव मोदी यांनी जमीन विकत घेतली, त्याच्या विरोधात आम्ही त्या जमिनीमध्ये ट्रॅक्टरने नांगरट करून आंदोलन केले. त्यावेळी आमदार राम शिंदे स्वतः प्रतिनिधी होते. मात्र, त्यावेळी काहीही बोलले नाहीत. आमदार शिंदेंच्याच काळात हा व्यवहार झाले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news