त्यामुळे 'पवित्र' पोर्टलमार्फत नियमित शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळातील रिक्त जागांवर शिक्षक भरण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यानुसार, आता नगर जिल्हा परिषदेकडील 350 रिक्त शिक्षकांच्या जागादेखील याच सेवानिवृत्त शिक्षकांमधून भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे समजते. त्यासाठी रिक्त जागांचा तपशील, त्यासाठी अर्ज मागाविणे, त्यानंतर अटी व नियमांची पूर्तता करणार्या पात्र उमेदवारांपैकी नियुक्त्या देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे आता महिनाभरातच सर्वच शाळांत शिक्षक नियुक्त झालेले पाहायला मिळणार आहेत.