गोवंशीय 47 जनावरांची सुटका; 14 टन मांस जप्त

गोवंशीय 47 जनावरांची सुटका; 14 टन मांस जप्त

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कासारे शिवारात तालुका पोलिसांनी गोवंशीय जनावरांचे तब्बल 13 टन मांस जप्त केले.

गोवंशीय जनावरांचे मांस ट्रकमधून नेले जात असल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजले. कासारे शिवारात जांभुळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्याने जाणारा हा ट्रक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास श्याम पसाद थोरात, श्याम रावबा नाईकवाडी, सुरेश मनोजकुमार कालडा यांनी अडविला व तालुका पोलिसांना माहिती कळवली.

पोलिस हवालदार राजेंद्र पालवे आणि दत्तात्रय बडधे यांनी तेथे जाऊन ट्रक ताब्यात घेतला. त्यात 13 टन मांस आढळले. पोलिसांनी जाकीरखान नसीरखान पठाण (वय 49, रा. मोगलपुरा, संगमनेर) व अय्युब मेहबूब कुरेशी (वय 53, रा. कुरणरोड, इस्लामपुरा, संगमनेर) या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. हवालदार बडधे यांनी फिर्याद दिली. हवालदार डी. जी. दिघे तपास करत आहेत.

दरम्यान, ट्रकमध्ये प्रत्यक्षात 13 टन असलेले मांस आधी पाच टन असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला. याबाबत पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नाही.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news