कोपरगावच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचा अभिमान : आ. आशुतोष काळे

कोपरगावच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचा अभिमान : आ. आशुतोष काळे
Published on
Updated on

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कोपरगावच्या शिवसैनिकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या चौकशीत चुकीचे काहीही निष्पन्न झाले नाही. यातून कोपरगावचे शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे, असे सांगत महाविकास आघाडीचा घटक या नात्याने पक्षाशी एकनिष्ठ कोपरगावच्या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सदस्य नोंदणीसाठी प्रतिज्ञापत्र भरून देण्याचे आवाहन केले होते.

त्यास राज्यासह कोपरगाव तालुक्यात शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाखो शिवसैनिकांनी सदस्य नोंदणी प्रतिज्ञापत्र भरून दिले. मात्र, हे प्रतिज्ञापत्र बोगस असल्याच्या नावाखाली या शिवसैनिकांच्या प्रतिज्ञापत्रांची मुंबई क्राईम ब्रँचकडून तब्बल तीन दिवस चौकशी करण्यात आली. अनेक शिवसैनिकांचे जबाब घेण्यात आले. परंतु, या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. कोपरगावच्या शिवसैनिकांनी दिलेली प्रतिज्ञापत्रं बोगस किंवा खोटी नसून, सत्य असल्याचे समोर आले आहे, असे आमदार काळे म्हणाले.

शिवसेनेला अनेकांनी सोडून देखील खरा शिवसैनिक हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे स्पष्ट होत आहे. आजही खर्‍या शिवसैनिकांची शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. त्यांच्या विचारांनी आजही प्रत्येक शिवसैनिक शिवसेनेशी कौटुंबिक नात्यात एकसंघ जोडल्याचे वास्तव चित्र दिसले. असे आमदार काळे म्हणाले, कोपरगाव तालुक्यात शिवसैनिक शिवसेना हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करतो, हे सिद्ध होते. स्वाभिमानी शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, याचा अभिमान वाटतो, असे आ. काळे म्हणाले.

शरद पवार यांच्याप्रमाणे शिवसेनेसोबत..!
महाविकास आघाडीचा धर्म पाळताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार अडचणीच्या काळात शिवसेनेसोबत राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना साथ देत आहेत. तसेच, कोपरगावच्या शिवसेनेसोबत उभे राहणार असल्याचा ठाम निर्धार आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news