अहमदनगर : मोबाईल, दुचाकी विकणारे पोलिसांनी पकडले

अहमदनगर : मोबाईल, दुचाकी विकणारे पोलिसांनी पकडले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा मुद्देमाल विक्री करण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी पकडले. या कारवाईत 87 हजार 300 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गेल्या आठ दिवसांत कोतवाली पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे. याआधी चोरीचा माल विक्री करणार्‍या तीन आरोपींना ताब्यात घेतले होते.

चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी काही इसम येणार असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक यादव यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार काटवण खंडोबा कमानीजवळ तीन चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या परवेज मेहबूब सय्यद (रा.काळे गल्ली, बुरुडगाव रोड, अहमदनगर) याला 50 हजार रुपये किमतीच्या तीन मोबाईलसह ताब्यात घेतले.

तसेच, चोरीची मोपेड विक्रीसाठी आलेल्या ऋषभ प्रकाश क्षेत्रे (रा.जहांगीरदार चाळ, बुरुडगाव रोड, अहमदनगर) याला चाणक्य चौक येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीची मोपेड मोटरसायकल जप्त करण्यात आली. तिसरी कारवाई पुणे बसस्थानक परिसरात करण्यात आली. पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी एका संशयितरित्या फिरत आसलेल्या महिलेची चौकशी करून झडती घेतली असता चोरीतील 7 हजार 300 रुपये रोख रक्कम आढळून आली.

पोलिसांनी तिला तिचे नाव विचारले असता अश्विनी अविनाश भोसले (रा. माहीजळगाव, ता.कर्जत) असे सांगितले. प्रवासी बसमध्ये चढताना ही रक्कम चोरल्याची कबुली तिने दिली. पुणे बसस्थानक येथून 29 मे व 11 जून रोजी रोख रक्कम चोरणार्‍या दोन महिलांना पोलिसांनी पकडले असून, त्याच्याकडून 7 हजार 300 व 3 हजार 100 अशी रक्कम जप्त करण्यात आली. बसस्थानकावरून ज्या नागरिकांचे पैसे चोरीला गेले त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार देऊन रोख घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news