नगर : जिल्हांतर्गत बदल्यांना मुहूर्त! आजपासून प्रक्रिया

नगर : जिल्हांतर्गत बदल्यांना मुहूर्त! आजपासून प्रक्रिया
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांपासून लक्ष लागलेल्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना अखेर मुहूर्त सापडला आहे. आजपासून (दि.21) ही प्रक्रिया सुरू होणार आहे, तर 25 डिसेंबरला संबंधित शिक्षकांना नव्या शाळा मिळणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण शासनाने घेतले आहे. त्यानुसार आता ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

यामध्ये आज 21 ऑक्टोबर रोजी अवघड शाळांची यादी प्रसिद्ध होणार आहे. तसेच, बदलीपात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी देखील आजच प्रसिद्ध केली जाणार आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत रिक्त पदाची यादी तयार केली जाईल, विशेष संवर्ग मधील फॉर्म भरणे, त्यावर आलेल्या अपिलावर निर्णय घेणे, प्राधान्य क्रम भरणे, विस्थापित शिक्षकांसाठी राऊंड घेणे, अवघड क्षेत्रातील जागा भरणे, यासह अन्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 25 डिसेंबर रोजी बदली झालेल्या शिक्षकांना आदेश देणे, असा हा 2 महिन्यांचा मेगा कार्यक्रम असणार आहे.

बदली कार्यक्रम जाहीर झाल्याने अवघड क्षेत्रातील शिक्षकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे भरती प्रक्रिया राबविणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news