Nagar : शॉर्टसर्किटमुळे भीषण आगीत दीड एकर ऊस खाक

Nagar : शॉर्टसर्किटमुळे भीषण आगीत दीड एकर ऊस खाक

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे वीजतारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीमुळे सदाशिव शंकर कुताळ यांचा दीड एकर ऊस खाक झाला. मंगळवारी (दि. 9) दुपारी तीनच्या सुमारास कुताळमळा परिसरात ही घटना घडली. शेतातील उभा उस जळून खाक झाल्याने ऐन दुष्काळात कुताळ यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. संबधित महावितरण व महसूल मंडळ अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍याने केली आहे.

सदाशिव कुताळ यांनी कुताळमळा परिसरातील आपल्या शेतात दीड एकरात ऊसलागवड केली होती. उसाची योग्य निगा राखल्याने वाढ चांगली होती. पाणी कमी पडू नये यासाठी दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा एक किलोमीटरवरून पाणी आणून पीक जगवले होते. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुष्काळात दुभत्या जनावरांसाठी चारा म्हणून ऊस राखला होता. ऊस जळाल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचीच दखल घेऊन महसूल व महावितरणच्या वतीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news