आ. काळेंचा कोल्हे गटाला धक्का! कोपरगाव भाजप उपशहरप्रमुख राष्ट्रवादीत दाखल | पुढारी

आ. काळेंचा कोल्हे गटाला धक्का! कोपरगाव भाजप उपशहरप्रमुख राष्ट्रवादीत दाखल

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वीच कोपरगाव शहरात राजकीय भूकंप होऊन कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी कोल्हे गटाचे आणखी कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्याचे प्रत्यंतर दोनचं दिवसात आले. नुकतेच कोल्हे गटाचे माजी नगरसेवक व उपशहर प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत.

दरम्यान, आ. काळे यांनी कोल्हे गटाला दोन दिवसात दुसरा मोठा धक्का दिल्याची चर्चा राजकीय गोटात सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप स्थापना दिनाच्या दिवशी भाजपच्या कोल्हे गटाला मोठा हादरा बसला. कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, नगरसेवक बाळासाहेब आढाव आदी कोल्हे समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आ. काळे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यानंतर सोमवारी पुन्हा कोल्हे गटाचे माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर व उपशहर प्रमुख सोमनाथ आहिरे यांनी आ. काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आ. काळे यांनी कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहराच्या विकास कामांवर प्रभावित होवून आम्हाला आमच्या प्रभागाचे विकास कामे आ. काळे यांच्या मार्फत मार्गी लावून विकास प्रवाहात सहभागी व्हायचे आहे, म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे कोल्हे गटाचे माजी नगरसेवक खांडेकर व उपशहर प्रमुख आहिरे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button