मंत्री विखे पाटलांची पारनेरमध्ये मतपेरणी! अण्णा हजारेसह विजय औटींची घेतली भेट | पुढारी

मंत्री विखे पाटलांची पारनेरमध्ये मतपेरणी! अण्णा हजारेसह विजय औटींची घेतली भेट

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यात गाठीभेटींचा धडाका लावला. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्याशी संवाद साधत कार्यकर्त्यांना सूचना केल्या. दोन दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना आलेली धमकीचे पडसाद जिल्हाभर उमटले. ऑडिओ क्लीपमधील आवाज असणार्‍यांविरोधात पुरावे सादर करत कारवाईची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आलेली आहे. त्यापाठोपाठ मंत्री विखे पाटील यांचा पारनेर दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

औटीसोबत तासभर चर्चा

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा पारनेर दौरा लक्षवेधी ठरला आहे. विखे पाटील यांनी राळेगणमध्ये जात अण्णांची भेट घेत त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. हजारे-विखे यांच्यात अर्धातास बंद दाराआड चर्चा झाली. मंत्री विखे पाटील हे माजी आमदार विजय औटी यांच्या निवासस्थानी गेले. तेथे दोघांत तासभर चर्चा झाली. या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून त्याचा तपशीलही समजू शकला नाही.

हेही वाचा

Back to top button