Nagar Crime News : आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यास मारहाण

file photo
file photo
Published on
Updated on

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : बनावट कागदपत्रांवर सही देण्यास नकार दिल्याने आरटीओ कार्यालातील लिपिकास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुजेफ युनुस जमादार व शोएब युनुस जमादार असे आरोपींची नावे आहेत. सुनील जगन्नाथ देवरे (कनिष्ठ लिपिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे.

फिर्यादीत म्हटले की, दि. 23 नोव्हेंबर रोजी आपण आपल्या कार्यालयात कामकाज करीत असताना आरोपी या ठिकाणी आले. वाहनावरील बोजा कमी देत वाहन हस्तांतरीत करण्याची मागणी करू लागले. मात्र त्यांनी आणलेल्या कागदपत्रांबाबत साशंकता आल्याने मी त्यांना थांबण्यास सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी आपणास जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच यातील एकाने आपल्या खिशातून चाकुसारखे धारधार शस्त्र काढून आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

प्रसंगावधून राखीत आजूबाजूला असणार्‍या कर्मचार्‍यांनी त्यास पकडल्याने मोठा अनर्थ टळला. या सर्व प्रकारामुळे आरटीओ कार्यालयात एकच गोंधळ उडाला. देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सरकारी कामाथ अडथळा आणने, मारहाण करणे तसेच अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.यातील मुख्य आरोपी हुजेफ यूनुस जमादार यास पोलिसांनी अटक केली आहे. दुसर्‍या आरोपीचा शोध पोलिस घेत आहे. यापुर्वीही अशा प्रकारच्या घटना या कार्यालयात घडलेल्या आहेत. कर्मचार्‍यांनी अनेकवेळा कामकाज बंदही ठेवलेले होते.

अनेक वेळा असे प्रकार घडल्यानंतरही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने. मुजोर झालेल्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंठक लोकांचे मनोबल वाढल्याने, हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. आता तरी श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील दलालांच्या दादागिरीला आळा घातल्या जाईल का?, आरटीओ कार्यालयास पडलेल्या दलालांच्या विळख्या संदर्भात, राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील यापूर्वी नाराजगी व्यक्त केली होती.

मात्र त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजगी नंतरही, आरटीओ कार्यालयात हे प्रकार सुरूच असल्याने, आज एका शासकीय कर्मचान्याच्या जीवावर बेताल. जर अधिका-यांची ही अवस्था असेल तर सर्व सामान्य जनतेला काय त्रास होत असेल, याचा विचार करणंच अवघड आहे.
आरटीओ कार्यालयात एजंटांकडून नेहमीच येथील कर्मचार्‍यांना त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर

या घटनेचा व्हिडिओ चित्रण सोशल मिडीयामधून प्रसिध्द झाल्यानंतर अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात यापुर्वीही असे प्रकार घडलेले आहेत. परंतु नुकताच घडलेला हा प्रकार भयानव्ह आहे. या एजंटाने खुलेआम आपल्या खिशातील शस्त्र काढून कर्मचार्‍यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. येथील आरटीओ कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून एका समाजाच्या लोकांनी आपली दादागिरी सुरू केलेली आहे. त्यांच्या या जाचाला कंटाळून अनेक अधिकार्‍यांनी या ठिकाणाहून बदल्या केलेल्या आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news