अ‍ॅड. जाधव यांचा उपक्रम कौतुकास्पद; खा.डॉ. सुजय विखे पाटील | पुढारी

अ‍ॅड. जाधव यांचा उपक्रम कौतुकास्पद; खा.डॉ. सुजय विखे पाटील

नगर : पुढारी वृत्तसेवा : समाजामध्ये काम करीत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करतात. विकासाच्या कामाबरोबरच सामाजिक प्रश्न सोडविण्याचे कामही करीत असतात. दिव्यांग व्यक्ती ही समाजामध्ये वावरत असताना त्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत असते. अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्कूलमध्ये जाण्यासाठी धडपड करीत असतात.

अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात देत मोफत स्कूल बस सेवा सुरू केले आहे. अ‍ॅड. जाधव यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून देखील गरजू रुग्णांना मदतीचा हात देत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे माझ्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे तो कौतुकास्पद असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅड. धनंजय जाधव यांच्या वतीने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत स्कूल बस सेवेचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी अजित माने, अमित घाडगे,राहुल मुथा,पुरुषोत्तम सब्बन,अक्षय संभार उपस्थित होते. अ‍ॅड. धनंजय जाधव म्हणाले, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत स्कूल बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद पाहून मनाला समाधान मिळते. चांगल्या कामासाठी सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा मिळते.

हेही वाचा

पुरावे नाहीत म्हणून मराठा समाजाची फसवणूक : मनोज जरांगे पाटील

पायी चालण्यासाठी सर्वात लांब रस्ता

यवतमाळ: पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास

Back to top button