खासगी जागेमध्ये मनपाचे बांधकाम; अधिकार्‍यांनी पैसे मागितल्याचा आरोप

खासगी जागेमध्ये मनपाचे बांधकाम; अधिकार्‍यांनी पैसे मागितल्याचा आरोप
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : सीना नदी काठी नागापूर हद्दीत खासगी जागेत महापालिकेने अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले आहे. त्या बेकायदेशीर बांधकामाला परवानगी देणार्‍या अधिकार्‍याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जागा मालक बाळासाहेब सोनवणे यांनी आयुक्तांकडे केली आहे. निवेदनात म्हटले, नागापूर येथे गट नंबर 130, नवीन गट नंबर 28/1 येथे माझी स्वमालकीची जागा आहे. त्या जागेवर गेलो असता तिथे बांधकाम चालू असल्याचे दिसले. आमची कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता मनपाने तिथे बांधकाम सुरू केले आहे. ते बांधकाम त्वरित बंद करावे. बांधकाम करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी.

दरम्यान, महापालिका विभागातील काही अधिकार्‍यांनी आम्हाला पैशाची मागणी केली होती. आम्ही पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी आम्हाला त्रास देण्यास सुरूवात केली. आमच्या खासगी जागेत बेकायदेशीर पालिकेचा निधी खर्च करणार्‍या तसेच उच्च न्यायालय, वरिष्ठ अधिकारी व पदाधिकार्‍यांची फसवणूक करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करण्यात यावी. संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई न केल्यास आयुक्तांच्या दालनात सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला.

चौकशी करून अहवाल द्या
बेकायदेशीर बांधकामबाबत शहर अभियंत्यांनी तत्काळ अहवाल सादर करून कायदेशीर करवाई करावी, असा स्पष्ट आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला आहे. तक्रारदाराकडे पैसे मागत खासगी जागेत मनपाचा निधी खर्च करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून अहवाल सादर करावा, असा अभिप्राय आयुक्तांनी नोंदविला आहे.

मिळकतीचीही चौकशी करावी
संबंधित अधिार्‍यांनी बेकायदेशीर मार्गाने कमविलेली माया आणि सद्धपरिस्थिती असलेली प्रॉपर्टी याची चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत निवृत्तीवेतन, ग्रॅज्युटीचा लाभ देऊ नये, दिल्यास वरिष्ठ अधिकारी जबाबदारी राहील, असे सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news