नगर जिल्ह्यात 7 ऑगस्टपासून मिशन इंद्रधनुष

नगर जिल्ह्यात 7 ऑगस्टपासून मिशन इंद्रधनुष
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  लसीकरणापासून वंचित राहिलेली बालके आणि गरोदर मातांसाठी विशेष मिशन इंद्रधनुष मोहीम राज्यात राबविली जात आहे. या धर्तीवर जिल्ह्यातही 7 ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने कार्यक्रम राबविला जाणार आहे. याव्दारे लसीकरणाचे प्रमाण 90 टक्केच्या पुढे वाढावे हे विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. अहमदनगर जिल्ह्यात या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी 2 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यबल गटाची सभा घेण्यात आली. जिल्हयातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयं सेविका यांचे प्रशिक्षण तसेच पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली व मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले.

या मोहिमेकरीता जिल्हा परिषद सार्वजनिक आरोग्य विभाग सज्ज असून जिल्हयातील सर्व 0 ते 2 वर्ष व 2 ते 5 या वयोगटातील बालकांचे आणि गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. स्थलांतरित मजूर, लोकवस्ती, वीट भट्टी, बांधकाम मजूर, दुर्गम भाग लोकवस्ती हे भाग यासाठी प्राधान्य असणार आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणाविना वंचित राहू नये, तसेच लसीकरणा अभावी बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी आता आरोग्य विभाग मार्फत यू विन अ‍ॅपचा वापर करत बालकांची लसीकरण 4 नोंदणी केली जाणार आहे.

या अ‍ॅपमुळे बालकांचे लसीकरण सोपे झाले असून ते 18 वयोगटातील तसेच गरोदर 0 आणि स्तनदा मातांना देण्यात येणार्‍या लसीकरणाची माहितीही एका क्लिकवर मिळणार आहे. बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आता 'यू विन अ‍ॅप' वर नोंद केल्यानंतर बालकांचे लसीकरण होणार आहे. या अ‍ॅप मुळे इतर जिल्ह्यांत किंवा राज्यांत लस घेणे शक्य होणार आहे. काही कामासाठी स्थलांतरित असेल किंवा जिल्ह्यातील अनेक स्तलांतरित कुटुंबियांसाठी या प घ्या कि माध्यमातून ते ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात असतील तेथील लसीकरणाची वेळ पाहून तेथे बालकाला लसीकरण देऊ शकतील.

पालकांनी नोंदणीसाठी मातेचे आधारकार्ड लिंक असलेला मोबईल नंबर सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे. लसीकरण केंद्रावर लसीकरणा दिवशी ही नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 मोहिम 100 टक्के यशस्वी करणेबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा शल्यचिकितस्क डॉ.संजय घोगरे यांनी केले आहे.

असा असेल कार्यक्रम
विशेष मिशन इंद्रधनुष 50 ही मोहीम 3 फैल्यांमध्ये घेण्यात येणार आहे. 7 ते 16 ऑगस्ट 2023 रोजी पहिली फेरी, 11 ते 16 सप्टेंबर 2023 दुसरी फेरी 9 ते 14 ऑक्टोबर 2023 रोजी तिसरी फेरी होणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news