मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा; कर्जत नायब तहसीलदारांना सकल जैन समाजातर्फे निवेदन

मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा; कर्जत नायब तहसीलदारांना सकल जैन समाजातर्फे निवेदन

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : येथील सकल जैन समाजातर्फे तहसील कार्यालयावर जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. कर्नाटक राज्यातील चिकोडी येथील जैन धर्मगुरू आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करत हल्लेखोरांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज कर्जत तालुका सकल जैन समाजातर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये प्रसाद शहा, अभय बोरा, अ‍ॅड. अशोक कोठारी, डॉ. प्रकाश भंडारी, स्वप्निल देसाई, रवींद्र कोठारी, सचिन बोरा, विजय खाटेर, चेतन शहा, सचिन मुनोत, राजेंद्र बोरा, दीपक शहा, डॉ. उदय बलदोटा, पिंटू शर्मा, ऋषभ अच्छा, प्रितेश मंडलेचा, सुरज जोशी, नगरपंचायतीचे उपगट नेते सतीश पाटील, प्रसन्न शहा यांच्यासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात सकल जैन समाजचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. प्रकाश भंडारी म्हणाले, जैन धर्म गुरु आचार्य कामकुमार नंदी महाराजांची हत्या करण्यात आली. यामुळे सर्व बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आहे. तरी आमच्या भावना प्रशासनाने लक्षात घेऊन याबाबत कार्यवाही करावी.

प्रसाद शहा म्हणाले, देशामध्ये केवळ सकल जैन समाज नव्हे, तर भारतीयांनी या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. आज कर्जत तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. आमची मागणी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करण्यात येईल. यामुळे शासनाने मागणीचा विचार करावा.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news