file photo
file photo

नगर: श्रीरामपुरात एकावर प्राणघातक हल्ला

Published on

श्रीरामपूर (नगर), पुढारी वृत्तसेवा: श्रीरामपूरच्या श्रीरामनवमीच्या यात्रेत रहाट पाळण्यात फुकट बसण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणावरून काल पुन्हा एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अनिकेत बाळासाहेब फुलपगार (वय 23, धंदा मजुरी, रा. रासकरनगर, बेलापूर रोड, वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 22 एप्रिल रोजी 6 च्या सुमारास आपण श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 5 मधील कुंदन कापडाचे दुकानासमोर असताना आरोपी गोरख जेधे, रामा वादे आणि सुत्या (पुर्ण नाव माहित नाही, सर्व रा. श्रीरामपूर) यांनी श्रीरामनवमीच्या यात्रेत रहाट पाळण्यात फुकट बसण्याच्या कारणावरून माझ्या डोक्यात टिकावाचा दांडा व लोखंडी दांडा मारून मला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत फुलपगार हा गंभीर जखमी झाला असून त्याला नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news