आश्वी ग्रामपंचायतीत दिसणार महिलाराज; इच्छुकांचा हिरमोड

आश्वी ग्रामपंचायतीत दिसणार महिलाराज; इच्छुकांचा हिरमोड

आश्वी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठीची अतिंम प्रभाग रचना करिता विशेष ग्रामसभा बोलावून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. ग्रामपंचायतीत महिलाराज येणार आहे. यावेळी चार प्रभागातून 11 उमेदवार नशिब आजमावणार आहे. अनेकाचा हिमोड झाल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आता उमेदवारी शोध मोहीम सुरु होणार !. निवडणूकांना स्थगित देऊन मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक केली होती.

वर्षापासून रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका टप्प्यात – टप्प्याने घेण्यात आल्या. मुदत संपून 1 वर्ष उलटल्याने ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आवश्यक असलेल्या अतिम प्रभाग रचनेची प्रक्रिया विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून पार पडली. यावेळी मंडळ अधिकारी पवार, ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे, कामगार तलाठी भालचिन यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. 4 हजार 322 लोकसंख्या चार प्रभागाच्या 11 जागांसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आले.

प्रभाग क्र. 1 मध्ये 2 जागापैकी 1 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग महिला तर 2 री जागा नागरीकांच्या मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्र. 2 मध्ये 3 जागापैकी 1 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग व्यक्ती, 2 री जागा सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती तर 3 री जागा सर्वसाधारण प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 3 मध्ये असलेल्या 3 जागापैकी 1 जागा सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती तर 2 री जागा या सर्वसाधारण प्रवर्ग महिला, प्रभाग क्र. 4 मध्ये 3 जागापैकी 1 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीं, 2 री जागा ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर 3 री जागा ही अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. दिनकर गायकवाड, माजी उपसरपंच सुनील मांढरे, युनुसभाई सय्यद , विजय गायकवाड, सुयोग सोनवणे, दिपक सोनवणे, अमोल मुन्तोडे, प्रदीप वाल्हेकर, संतोष भडकवाड, सोपान सोनवणे, विकास गायकवाड, बाबासाहेब भोसले, मोहित गायकवाड, पुरुषोत्तम भवर, दत्ता गायकवाड, माणिक भवर, रमेश पवार, फकिरा मोरे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवार शोधण्यास सुरूवात

यापुर्वी काढण्यात आलेल्या लोकनियुक्त सरपंचपद सोडतीत सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आरक्षित झाले. तर नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनुसार सदस्य पदाच्या 11 जागांपैकी 6 जागा सुध्दा महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाल्यामुळे आता ग्रामपंचायतीत 'महिला राज ' दिसणार असल्याने पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. व आ. बाळासाहेब थोरात गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवार शोध मोहीमेस सुरुवात झाली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news