Mahadev Jankar : रासप सर्व निवडणुका लढणार : महादेव जानकर

Mahadev Jankar : रासप सर्व निवडणुका लढणार : महादेव जानकर
Published on
Updated on

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : मी भाजप किंवा राष्ट्रवादीचा चमचा म्हणून नव्हे तर मी माझ्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी जनस्वराज यात्रा काढली आहे. माझा राष्ट्रीय समाज पक्ष नगरपंचायतीपासून लोकसभेपर्यंत शिर्डी विधानसभा क्षेत्रातील सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असून काट्याची टक्कर देऊन विजयी होऊ, असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनस्वराज यात्रा दोन दिवस चालली होती. तालुक्यातील पाचेगाव येथून जनस्वराज्य यात्रेस प्रारंभ करण्यात आला. नंतर इमामपूर, गोनेगाव, निंभारी, करजगाव, तामसवाडी, माळीचींचोरा, भानसहिवरा, भेंडा, कुकाणा, तरवडी, वाकडी, गेवराई, शिरसगाव, सलाबतपूर, खडका, नेवासा फाटा या मार्गे निघालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

या यात्रेदरम्यान नेवासा विधानसभा अध्यक्ष संतोष काळे यांच्यासह प्रदेश महासचिव माऊली सलगर, सय्यद बाबा, सचिव रवींद्र कोठारी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ जुनधारे, मतकर आदी उपस्थित होते. नेवासा येथे झालेल्या सांगता सभेमध्ये मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या ठिकाणी संतोष काळे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.

महादेव जानकर म्हणाले, की भाजपने आमचा विश्वासघात केला. आम्हाला वापरून घेतले. आता आम्ही आमचे झोपडे बांधत आहोत. प्रत्येक ठिकाणी प्रबळ लढत देण्यासाठी माझा पक्ष व माझे बांधव एकसंघ झालेले आहेत. महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा जर्‍हाड, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत मतकर, तुकाराम बाचकर, तोफिक पठाण आदी स्थानिक नेते उपस्थित होते. तालुकाध्यक्ष गोरख होडगर यांनी आभार मानले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news