नगरकरांना फसविणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

नगरकरांना फसविणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
Published on
Updated on

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : बँक अधिकारी असल्याचे सांगून कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली. त्यात पश्चिम बंगाल चार व झारखंडमधील एका आरोपीचा समावेश आहे.
मोहम्मद अब्दुल कुदस मेहबूब (वय 34, रा. ऊर्दू शाळेजवळ ता. लखना, जि. हजारीबाग, झारखंड), एतेशाम एमडीनईम आलम (वय 34, रा. राईचारण घोसलाई, कोलकत्ता), अजिज लतीफ शेख अब्दुल, (वय 34, रा. मोमीनपूर रोड, कोलकत्ता), मुकेश कुमार दुर्योधन नायक (वय 26, रा. बोस रोड कोलकत्ता, पश्चिम बंगाल), गंगा लक्ष्मी सहा, (वय 45, रा. 24 परगणा कलकत्ता) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत हकीगत अशी ः 14 जून 2023 रोजी कोतवाली पोलिसांना मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयातील मीरा रोड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक किरण वंजारी यांच्याकडून माहिती मिळाली, त्यानुसार कोतवाली पोलिसांनी अधिक माहिती घेऊन शहरातील कापडबाजार मोची गल्ली परिसरात अन्य ठिकाणी काही इसम बँकेतील अधिकारी, कर्मचारी असल्याचे व्यापार्‍यांना व्यावसायाकरिता कर्ज मंजूर करून देतो, असे सांगत आहेत. त्यांच्याकडून कागदपत्रे गोळा करीत असल्याची माहिती समोर आली.

त्या टोळीतील एक सदस्य मोची गल्लीतील एका व्यापार्‍याच्या दुकानात आलेला आहे. तो टाटा कॅपिटल फायनान्सकडून आल्याचे सांगत आहे. त्यास चौकशीकामी ताब्यात घेतले. त्याचे चार साथीदार अभिषेक लॉज माळीवाडा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध कंपन्याचे बँकेतील बनावट ओळखपत्र, बनावट आधार कार्ड, मोबाईल, बनावट आयकार्ड, रबरी शिक्के असा 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक मनोज कचरे, मनोज महाजन, पोलिस हेडकॉन्स्टेबल तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, सलीम शेख, बापूसाहेब गोरे, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news