नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासकीय वाळू डेपो सुरू झाले. दरम्यान, 600 रुपये ब्रास शासकीय दरात खरेदी केलेल्या वाळू वाहतुकीवरून वाद सुरू झाले. त्यातच शासनाचे सुधारीत वाळू धोरणाचा अध्यादेश समोर आला. नवीन अध्यादेशात डेपो व्यवस्थापनाचा दर ग्राहकांच्या माथी मारला आहे. परिणामी प्रति ब्रास वाळूसाठी ग्राहकांना सुमारे दोन हजार रुपये मोजावे लागत असल्याचे वास्तव समोर आले. शासनाची स्वस्तात वाळू धोरणापेक्षा ती न वापरलेलीच बरी, त्यापेक्षा क्रश सॅण्ड बरा, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासकीय वाळू विक्री डेपो सुरू झाले. राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर-डिग्रस गावालगत मुळा नदी पात्रामध्ये शासकीय वाळू डेपो सुरू झाला.