Accident : मुंबई-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा अपघात | पुढारी

Accident : मुंबई-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा अपघात

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 2.30 वा.चे सुमारास मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर कि.मी 25.300 येथे खालापूर पोलीस ठाणे हद्दीत किरकोळ दुखापत अपघात घडलेला आहे. तीन वाहनांचा अपघात झाला आहे. ( Accident )

यातील आयसर टेम्पो क्र एमएच 10 सीआर 9416 यावरील चालक शिवाजी वसंत खाकडे वय 49 वर्ष , रा. मालाड, मुंबई हे त्यांच्या ताब्यातील वाहन घेऊन मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने मुंबई बाजूकडे चालवीत घेऊन जात असताना माडप बोगद्याच्या पुढे किमी 25.300 येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने गाडीचा वेग कमी केला. यानंतर पाठीमागून येणारी किया कार एमएच 10 ईई 9002 वरील चालक तुषार नवनाथ पुणेकर वय 22 वर्ष रा.सांगोला, सोलापूर यांनीही गाडीचा वेग कमी केला.

मागून येणार्‍या ट्रक क्रमांक केए 18 8904 वरील चालक सैय्यद जाफर रा. चिकमंगळूर, कर्नाटक यांना त्यांची गाडी नियंत्रित करता न आल्याने पुढील किया कार ला जोरदार धडक दिली. या सदर कार पुढील आयसर टेम्पो जाऊन धडकुन अपघात घडला. अपघातात किया कारचे पुढील व मागील भागाचे नुकसान झाले असून कार मधील एका महिला प्रवाशाच्या हाताला व पायाला किरकोळ दुखापत झालेली आहे. अपघातग्रस्त वाहने खठइ गाडीच्या साहाय्याने शोल्डर लेनवर उभे केले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

अपघाताचे ठिकाणी पळस्पे मोबाईल वरील स्टाफ व आय आर बी स्टाफ तसेच रसायनी पोलीस मदत केंद्र स्टाप हजर होते सदर बाबतची माहिती खालापूर पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे, तसेच चालक यांना खालापूर पोलीस ठाणे येथे जाण्याची समज देण्यात आली आहे. ( Accident )

Back to top button