

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नागरिक आपल्या विविध समस्यांच्या निपटरा करण्यासाठी तहसिल कार्यालयात प्रवेश करताच दक्षिणेकडील भागात अवैध वाळू वाहणारी जप्त केलेली वाहने आडवी लावण्यात आली आहे. या वाहनाचा नागरिक, अधिकारी , पोलिस याचा त्रास होत आहे, ही वाहने तातडीने काढून घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात तहसिल कार्यालय असून या ठिकाणीच शहर पोलिस स्टेशन, पुरवठा विभाग, दुय्यम उपनिबंधक आदींसह वेगेवेगळी कार्यालये आहे.
कार्यालयाला तीन मुख्य प्रवेशद्वार असून उत्तरेकडील प्रवेशद्वाराचा शासकीय अधिकारी, पोलिस वापर करतात तर पुर्वेकडील प्रवेशद्वार बंदच करण्यात आले आहे. दक्षिणेकडील प्रवेशद्वार मात्र सर्वसामान्य नागरिकांना सोयीस्कर असून याच प्रवेशद्वाराचा वापर अधिक होता. या ठिकाणी दररोज हजारो नागरिक विविध कामानिमित्त येत असतात. मात्र महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणार्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. रिक्षा, पिकअप, जीप , ट्राँली ही सर्व वाहने प्रवेशद्वारातच उभी करण्यात आली आहे.
ही वाहने याठिकाणी उभी केली असल्याने प्रवेशद्वाराचा दरवाजा बंद झाला आहे. वाहने याठिकाणी उभी असल्याने येणार्या जाणार्यांना मोठी अडचण होत असून प्रवेश करताना एका वेळी एकच व्यक्ती प्रवेश करू शकते. ऐन गर्दीच्या वेळी नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. तहसिल आवारात जप्त केलली वाहने ठेवण्यात आल्याने डास, कचरा मोठ्या प्रमाणात साचला असून त्या कचर्यांचा मोठी दुर्गधी सुटली आहे.
शासकीय अधिकारी, पोलिसांना शासकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, मात्र नागरिकांना होणार्या त्रासकडे दुर्लक्ष केले जाते. शासकीय अधिकारी कायद्याचा वापर करत असतांना अस्वच्छता करणार्यावर कारवाई का केली जात नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.
तहसील कार्यालयाच्या आवारात नागरिकांसाठी स्वच्छतागृहे बांधली असून नागरिक गुटक्यांच्या लाल पिचकार्या मारतात. कागदे फेकतात, कचरा टाकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गधी सुटली आहे. तहसिलदार यांनी यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकामधून जोर धरत आहे.
हेही वाचा