अहमदनगर बाजार समितीत मुगाला उच्चांकी भाव

अहमदनगर बाजार समितीत मुगाला उच्चांकी भाव

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकर्‍याच्या मुगाला सोमवारी (दि.21) उच्चांकी भाव मिळाला. समितीच्या भुसार बाजारात प्रतिक्विंटल 10 हजार 841 रुपये या उच्चांकी दराने मुगाचा लिलाव झाला.
नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील शेतकरी रमेश भानुदास धामणे यांनी सोमवारी (दि.21) 7 कट्टे मूग विक्रीसाठी समितीच्या भुसार बाजारात आणला होता.

सचिन वाघ यांच्या आडतीवर झालेल्या लिलावात धामणे यांच्या उच्च प्रतीच्या मुगाला प्रतिक्विंटल 10 हजार 841 रुपये असा उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे सचिन वाघ यांनी रमेश धामणे यांचा फेटा बांधून सत्कार केला. यावेळी राजू धामणे, बंडू धामणे, मंगेश धामणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान,भुसार बाजारात सोमवारी शेतकर्‍यांनी 123 क्विंटल मूग विक्रीसाठी आणला होता. त्यास प्रतवारी नुसार 5 हजार ते 9 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तसेच शेतकर्‍यांनी तोडणीला आलेला मूग लवकरात लवकर तोडून बाजारात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news