नगर : चार लाख रुपयांचा गुटखा जप्त, डावरे गल्ली परिसरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नगर : चार लाख रुपयांचा गुटखा जप्त, डावरे गल्ली परिसरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Published on: 
Updated on: 

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जुन्या कचेरी परिसरातील डावरेगल्लीत अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून प्रतिबंधित गुटखा व सुपारीचा तीन लाख 93 हजार 18 रूपयांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई गुरूवारी (दि.10) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार (वय 35) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीद मलिक तांबोळी (वय 44, रा.डावरेगल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अन्न औषध प्रशासनाचे पथक तपासणी करण्यासाठी गेले असता मे. गरीब नवाज ट्रेडर्स (शॉप नं.2, सोना अपार्टमेंट, डावरे गल्ली) या दुकानात व तळमजल्यावर गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, तंबाखू विक्री होत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. पथकाने कारवाई करत तीन लाख 93 हजार 18 रूपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला असून दोन्ही गाळ्यांना सील ठोकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news