Nagar : गोदावरी कालवे नूतनीकरणाचे काम अस्ते कदम

Nagar : गोदावरी कालवे नूतनीकरणाचे काम अस्ते कदम
Published on
Updated on

कोपरगाव : अवर्षणग्रस्त दुष्काळी कोपरगांव व राहाता तालुक्यांना पाणी मिळावे, यासाठी ब्रिटीशांनी दारणा धरणाची निर्मीती केली. 1911 ते 1916 या कालावधीत 107 वर्षापुर्वी ब्रिटीशांनी गोदावरी डावा आणि उजव्या कालवे बांधून त्यातून पाणी दिले. पन्नास वर्षांपासुन नफ्यात असलेल्या गोदावरी कालव्यांच्या नशिबी मात्र निधीचा दुष्काळ आहे. याचे नुतणीकरणाचे काम 1983 म्हणजेच 40 वर्षापासून रखडले आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ सापत्नपणांची वागणूक देवून कालवे नुतणीकरणासाठी पुर्ण क्षमतेने निधी देत नाही, असे रडगाणे नेहमीच ऐकावयास मिळत आहे. गोदावरी कालवे नुतणीकरणाचे काम अस्ते कदम सुरू आहे.

संबंधित बातम्या :

सिन्नर, निफाड, येवला, कोपरगांव आणि राहाता तालुक्याचे सुमारे 33 हजार एकर क्षेत्र गोदावरी कालव्याच्या पाण्यांने सिंचीत होते. सुरूवातीला 1983 मध्ये गोदावरी कालवे नुतणीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यांत आला. त्यानंतर 75 कोटी 60 लाख 12 हजार रूपये खर्चाचा पहिला सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव 2 डिसेंबर 2002 मध्ये मंजुर करण्यांत आला. त्यानंतर यात सातत्यांने सुधारणा होवून 6 डिसेंबर 2016 मध्ये 115 कोटी 60 लाख रुपये खर्चाचा द्वितीय सुप्रमा मंजुर करण्यात आला. गोदावरी उजवा कालवा 110 तर डावा कालवा 89 किलोमिटरचा आहे. कालव्यांचे आर्युमान 107 वर्षांचे झाल्याने या कालव्याची वहनक्षमता वाढवून ती उजव्याची 750 तर डाव्याची 435 धनफुट प्रती सेकंदने वाढविण्यांचा निर्णय झाला.

त्यातच कमी पर्जन्यमान नगर- नाशिक विरूध्द मराठवाडा प्रादेशिक पाणी वादाचा फटका नुतणीकरणाचे कामास बसत आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने शासनस्तरावर गोदावरी कालवे नुतणीकरणाचे काम मार्गी लागावे म्हणून पाठपुरावा केलेला आहे. वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे गोदावरी कालव्यांतुन पाण्यांची जी आर्वतने दिली जातात, त्यामुळे कालवे नुतणीकरणास पुरेशा प्रमाणात वेळ मिळत नाही, परिणामी त्याचे नियोजन चुकते असे वरिष्ठ पातळीवर अधिकारी बोलतात.

फेब्रुवारी 2019 मध्ये गोदावरी उजव्या आणि डाव्या कालव्यांचे नुतणीकरण लोकसहभागातुन शासनाने हाती घेतले होते. नांदूर मध्यमेश्वर ते थेट कान्हेगावपर्यंत 8.13 लक्ष घनमीटर मातीकामासाठी केवळ इंधन खर्च म्हणून 2 कोटी 49 लाख 95 हजार रूपयांचा खर्च डाव्या कालव्यासाठी करण्यात येणार होता. त्यात सहकारी साखर कारखान्यांनी मोलाची मदत केली. पण हे काम काही पुर्ण झाले नाही. लोकसहभागासाठी लाभधारक शेतकर्‍यांनी, कारखानदारांनी, पाणी वापरकर्त्यांनी, आजी- माजी लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. मात्र सदर कालवे नुतणीकरणाचे काम तसेच प्रलंबित राहिले गेले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ सापत्नपणाची वागणुक देत असल्यामुळेच गोदावरी कालवे नुतणीकरणाची कामे रखडली, असा आरोप असंख्य शेतकर्‍यांनी केला आहे. शंभर वर्षांनी दुष्काळ आपत्ती पाहली, पण कालवे नुतणीकरणाची कामेही आता शंभर वर्षे उलटुनही होताना दिसत नाही. कोटीच्या कोटी रुपये मंजूर झाल्याचे फक्त ऐकिवात आहे.

कालवे कामास मुहूर्त कधी?
अनेक पंचवार्षीक निवडणुका या प्रश्नांवर लढल्या गेल्या. पण समस्या काहीही कमी झाल्या नाही. गोदावरी उजव्या आणि डाव्या कालव्याचे काटविमोचक, पुल, जलझंपी, कमान मोर्‍या, जलसेतु, रेल्वे कॉसिंग, सायफन, अतिवाहक, विमोचक अशी 400 ते 450 कामे आहेत, पण त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित कामांसाठी 2024 मध्ये मुहूर्त लागणार काय? आणि शेतकर्‍यांना कालवा आर्वतनांत फुटीच्या कालव्यातुनच पाणी मिळणार काय? अजुन किती कालवा सल्लागार समित्यांच्या बैठका या कालव्यांनी पहायच्या, असा सुर उमटत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news