नगर : महिलेची सहा लाखांची फसवणूक

नगर : महिलेची सहा लाखांची फसवणूक
Published on: 
Updated on: 

नगर : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील एका 31 वर्षीय महिलेला स्टील कंपनीतून बोलत असून स्टील देतो, असे सांगून एकाने सहा लाखांने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. अमित मित्रा गोयल नामक व्यक्तीने फसवणूक झालेल्या महिलेला 8436427798 या मोबाईल क्रमांकावरून दि.4 ऑक्टोबर रोजी संपर्क केला.

स्टील प्रायव्हेट लिमिटेड, रायपूर या कंपनीतून सेल्समन बोलत असल्याचे सांगून स्टील मिळवून देतो, असे सांगितले. तसेच, व्हॉटस् अ‍ॅपवर खोटी कागदपत्रे पाठवून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेने आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यावर सहा लाख रूपये पाठविले. महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news