नेवासा: माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन

नेवासा: माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन

नेवासा: पुढारी वृत्तसेवा :  नगर दक्षिणचे माजी माजी खासदार व शेवगाव-नेवाशाचे माजी आमदार तुकाराम गंगाधर गडाख उर्फ भाऊ (वय ६९ वर्षे) यांचे निधन शुक्रवार (दि. २) रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास झाले. नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील मूळ रहिवाशी असलेले तुकाराम गडाख यांचा जन्म १ नोव्हेंबर १९५३ सालचा आहे. १९८९ ते १९९४ त्यांनी अपक्ष शेवगाव-नेवासा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. तर २००४ ते २००९ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दक्षिण लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

त्यांचे मागे पत्नी ,एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. शनिवार दि.३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता नेवासा तालुक्यातील सोनई जवळील पानसवाडी येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गडाख यांच्या निधनामुळे नेवासा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. यावेळी राज्य व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. एक लढवय्या नेता म्हणून त्यांना राज्यात ओळखले जात होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news