file photo
file photo

आ. नितेश राणे यांच्यावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करा

Published on

नगर; पुढारी वृत्तसेवा : आमदार नितेश राणे अहमदनगर दौर्‍यावर आले असता शहरातील कापड बाजारात त्यांनी चौकसभा घेतली. त्यात महापालिका आयुक्त पंकज जावळे यांना शिवीगाळ केली. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केला. त्यामुळे आमदार राणे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बुधवारी अहमदनगर महापालिका कर्मचारी कृती समितीच्या वतीने करण्यात आली.

याबाबत कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की आयुक्तांना जातिवाचक शब्द वापरल्याचा आम्ही निषेध करतो. नगर शहराची शांतता भंग करण्याचा प्रकार आहे. दंगल घडून आणण्याचा प्रकार आहे. दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार असून ही गोष्ट निंदनीय आहे. आमदार असताना अधिकार्‍यांना हीन वागणूक देणार्‍या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. या वेळी कांतिलाल जावळे, विनोद घोरपडे, गणेश शेकटकर, गणेश पठारे, सुनीता चव्हाण, लखन गाडे, शरद भालेराव आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news