नगर : चांदेकसारे येथील शेतकरी अनुदानापासून वंचितच

नगर : चांदेकसारे येथील शेतकरी अनुदानापासून वंचितच
Published on
Updated on

पोहेगाव : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यामध्ये हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकर्‍यांना यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देणार असल्याचे जाहीर केले. काही अंशी त्याचे वाटपही करण्यात येत आहे, मात्र अजूनही 50% च्यावर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये चांदेकसारे परिसरातील शेतकर्‍यांची संख्या जास्त आहे. पंधरा दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात नुकसानीचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होईल, असे कृषी विभाग व महसूल विभागाकडून सांगण्यात येत होते.

ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक गावातील शेतकर्‍यांनी आपले खाते नंबर व आधार कार्ड जमाही केले, मात्र शासनाकडून केवळ 50 टक्के लोकांना नुकसानीचे अनुदान जमा झाले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता उर्वरित लोकांचेही अनुदानही जमा होईल अशी सांगण्यात येते, मात्र या परिसरातील शेतकरी ग्रामीण असल्याने त्याला प्रत्येक वेळी बँकेत चक्कर मारायला परवडत नाही. आपले पैसे आज येथील उद्या येतील, या आशेवर शेतकरी बँकेचे उंबरठे झिजवित आहे, मात्र बँकेत गेल्यानंतर बाबा अजून आपले पैसे जमा झाले नाही, असे बँकेच्या अधिकार्‍यांकडून जेव्हा सांगण्यात येते, तेव्हा मात्र बँकेतून परत येताना शेतकर्‍याच्या अंगात त्राण शिल्लक राहत नाही. शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता कृषी विभाग व महसूल विभागाने तत्काळ हे पैसे बँकेत का जमा होत नाही, याची खातरजमा करावी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news