नेवासा : वन विभागाच्या नोटिसा रद्द करण्याची शेतकर्‍यांची मागणी

नेवासा : वन विभागाच्या नोटिसा रद्द करण्याची शेतकर्‍यांची मागणी
Published on
Updated on

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मुकिंदपूर येथील गट नंबर 76 मधील रहिवाशांना वन विभागाने जागा खाली करण्यासाठी नोटीस दिली आहे. ही नोटीस त्वरित रद्द करून सातबारा उतार्‍यावर गावठाण विस्तारासाठी नोंद झालेले चार हेक्टर क्षेत्र प्रधानमंत्री योजना व इतर कामासाठी मुकिंदपूर ग्रामपंचायतीकडे वर्ग करावे, अन्यथा महाराष्ट्र दिनी प्रवरासंगम नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मुकिंदपूर येथील शासकीय वन जागेवर शेकडो कुटुंब वर्षानुवर्षे राहत आहेत. हे कुटुंबे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेसाठी पात्र आहेत. केंद्रच्या निर्देशानुसार केंद्र व राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या जमिनीवर राहत असलेल्या कुटुंबांना ते राहत असलेल्या जागेवरच घर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गट नंबर 76 च्या समस्ये संदर्भात मुकिंदपूर ग्रामस्थांनी 5 मार्च 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार व लेखी पत्राद्वारे यातील एकूण 12 हेक्टर 82 आर क्षेत्रापैकी चार हेक्टर क्षेत्र वाढीव गावठाणासाठी फेर क्रमांक 1509 नुसार वर्ग करण्यात आले. चार हेक्टर जागा उतार्‍यावर गावठाणासाठी राखीव ठेवलेली असताना ती जागा ग्रामपंचायतीकडे आजतागायत वर्ग झालेली नाही. त्यामुळे ही चार हेक्टर जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करावी, अशी मागणी करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news