कोपरगावच्या 51 रस्त्यांचे रुपडे पालटणार..! 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर

कोपरगावच्या 51 रस्त्यांचे रुपडे पालटणार..! 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव मतदार संघातील विविध रस्त्यांना निधी मिळावा, यासाठी केलेल्या पाठपुराव्याची महायुती सरकारने दखल घेवून सामाजिक न्याय विभागाने भारतरत्न डॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत कोपरगाव मतदार संघातील 51 रस्त्यांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव मतदार संघात रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यास राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, गावांतर्गत व वाड्या- वस्त्यांवर रस्त्यांना निधी देवून नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या अडचणी दूर केल्याचे आ. काळे म्हणाले.

मतदार संघात रस्त्यांसाठी 440 कोटीचा निधी आणला. उर्वरित रस्त्यांना निधीसाठी पाठपुरावा सुरु आहे. विविध रस्त्यांना आणखी 5 कोटीचा निधी मिळाला. या रस्त्यांचे काम लवकरच पूर्ण होवून नागरिकांच्या अडचणी दूर होणार आहेत. 5 कोटी निधीतून 51 रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत.

यामध्ये सुरेगाव येथे रामा 7 ते अनिल वाघ वस्ती 1 किमी रस्ता खडीकरणास (10 लक्ष), मढी बु. येथे ग्रामा 30 नानासाहेब जोर्वेकर घर ते बाळू माळी घर 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), संवत्सर येथे आंबादास वीर घर ते देविदास पगारे घर 500 मी. रस्ता (दशरथवाडी) डांबरीकरणास (10 लक्ष), शिरसगाव येथे अशोक उकिरडे घर ते दादासाहेब साळवे घर 1 किमी रस्ता खडीकरणास (10 लक्ष), मनेगाव येथे प्रकाश काले वस्ती ते रायभान गुंजाळ वस्ती 1 किमी रस्ता खडीकरणास (10 लक्ष), पोहेगाव येथे संगमनेर रोड ते नंदू औताडे वस्ती 1 किमी रस्ता खडीकरणास (10 लक्ष), सुरेगाव येथे रामा 7 ते रंगनाथ निकम शेत 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष),

माहेगाव देशमुख येथे चारी नं. 5 ते गणपतराव रोकडे घर 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), उक्कडगाव येथे मच्छिंद्र बागुल घर ते यादव त्रिभुवन घर (नांदगाव रोड) 1 किमी रस्ता डांबरीकरण (20 लक्ष), जवळके येथे संगमनेर रोड ते बिरोबा मंदिर 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), कोकमठाण येथे मारुती मंदिर ते समाज मंदिरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण (10 लक्ष), सुरेगाव येथे मधुकर निकम घर ते छबू माळी घर 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), कोळपेवाडी येथे चऊठ 85 ते ते महेश्वर नगर (लक्ष्मी माता मंदिर) चारी नं. पाच 500 मी रस्ता डांबरीकरण (10 लक्ष), वेस येथे जि. प. शाळा ते वेस पंचकेश्वर 1 किमी रस्ता डांबरीकरण (10 लक्ष), चितळी येथे दिपक तेलोरे घर ते प्रकाश गायकवाड घर 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष),

शिंगवे येथे संदिप आग्रे घर ते चांगदेव पगारे घर 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), देर्डे चांदवड येथे शांताराम मेहेत्रे घर ते नंदू कोल्हे वस्ती 500 मी. रस्ता डांबरीकरण (10 लक्ष),जळगाव येथे लक्ष्मण गायकवाड घर ते नंदाबाई जाधव घर 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), मौजे रामपूरवाडी येथे रविंद्र अभंग घर ते जि.प.शाळा 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), मौजे संवत्सर येथे चारी नं. 9 शिव रस्ता ते नवगिरे सोळसे वस्ती 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), रांजणगाव देशमुख येथे रांजणगाव स्मशानभूमी ते सुनील वर्पे वस्ती 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), कान्हेगाव येथे प्रकाश सांगळे घर ते बंकटराव जगताप घर 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), संवत्सर येथे भारुड मैंद वस्ती ते रामसिंगबाबा मंदिर 1 किमी रस्ता (पढेगाव चौकी पासून) खडीकरण करणे(10 लक्ष),

चासनळी येथे सिताराम जानकू चांदगुडे घर ते धेनक वस्तीकडे जाणारा 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), धामोरी येथे ग्रामा 1 दादा पगारे घर ते नवनाथ गोदावारे घर 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), मुर्शतपूर येथे रोहिदास भिवा मोरे घर ते ज्ञानदेव अर्जुन मोरे घरापर्यंत 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), कुंभारी येथे कुंभारी माहेगाव देशमुख शिव चारी नं. 5 बबन पांडुरंग रायभाने घर ते शंकर दशरथ ठाकरे घर 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), गोधेगाव येथे वाल्मिक सोनवणे घर ते शहादू पिराजी सोनवणे घर 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष), करंजी येथे चांगदेव माळवे घर ते रामभाऊ शिंदे वस्ती (करंजी वैजापूर रोड) 1 किमी रस्ता खडीकरण (10 लक्ष),

तिळवणी येथे वैजापूर कोपरगाव रोड ते राजश्री मनोज बागुल घर रस्ता खडीकरण करणे (5 लक्ष), तिळवणी येथे जुने समाज मंदिर ते सीताराम पगारे घर रस्ता खडीकरण (5 लक्ष), शहाजापूर येथे बाळासाहेब घोलप घर ते भाऊसाहेब शिंदे घर रस्ता खडीकरण (10 लक्ष), शहाजापूर येथे ज्ञानेश्वर मोरे घर ते ताराचंद जाधव घर रस्ता खडीकरण (10 लक्ष), रांजणगांव देशमुख येथे दलित वस्ती गावठाण ते वडझरी रस्ता खडीकरण (10 लक्ष),

देर्डे चांदवड येथे चांदखानबाबा मंदिर ते मस्जिदपर्यंत रस्ता खडीकरण (10 लक्ष), चासनळी येथे इंडेवाडी रोड सुभाष गाडे वस्ती ते गोरख धेनक वस्ती रस्ता खडीकरण (10 लक्ष), मंजूर येथे रामा 7 ते बाबुराव बर्वे घर रस्ता खडीकरण (10 लक्ष),भोजडे येथे घनघाव वस्ती रस्ता काँक्रीटीकरण (10 लक्ष) आदी कामांचा यात समावेश असल्याचे आ. काळे म्हणाले. 5 कोटी निधी दिल्याबद्दल आ. काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले.

नागरिकांनी मानले आ. काळेंचे आभार

कोपरगाव मतदार संघात अनेक वर्षांपासूनच्या रस्त्यांच्या अडचणी कायमच्या सुटणार असल्याने गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news