कर्जत : अकरा जेसीबींनी भंडार्‍याची उधळण

कर्जत : अकरा जेसीबींनी भंडार्‍याची उधळण

कर्जत : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील करमणवाडी येथे थोर संत बाळूमामा यांच्या पालखीवर 11 जेसीबीने भंडार्‍याची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. कर्जत तालुक्यातील करमणवाडी, पावणेवस्ती येथे संत बाळूमामा यांच्या पालखीचे 30 जुलै रोजी आगमन झाले होते. नऊ दिवस पालखी या ठिकाणी मुक्कामासाठी होती. यानिमित्ताने रोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित राहत होते.

रोज सकाळी आरती, प्रवचन, संध्याकाळी कीर्तन, महाप्रसाद यासह विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बापू हराळे, भरत पावणे, अक्षय पावणे, अशोक पावणे, रामदास मेहर, अंकुश बनसोडे, बापू पुणेकर, सुंदर पाहुणे, शरद चव्हाण, शहाजी हराळे, सचिन पवार, यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. सकाळी काल्याच्या कीर्तनाला दहा हजारांहून अधिक भाविकांनी हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. आरती झाल्यानंतर बाळू मामांच्या पालखीला फुलांची सजावट करून वाजत गाजत, फटाक्यांची आतिषबाजी करत अकरा जेसीबीच्या साह्याने भंडार्‍याची उधळण करत करमणवाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्या मिरवणुकीत अबालवृद्ध, महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत बाळू मामांची गाणी लावून हजारो भाविक भक्तीमय वातावरणात नृत्य करत होते. काही ज्येष्ठ मंडळींनीही तालावर ठेका धरला होता.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news