भेंडा : कामगारांच्या वारसांना विमा वितरण : माजी आमदार नरेंद्र घुले

भेंडा : कामगारांच्या वारसांना विमा वितरण : माजी आमदार नरेंद्र घुले
Published on
Updated on

भेंडा; पुढारी वृत्तसेवा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मयत कामगारांच्या वारसास विमा कंपनीचा दोन लाख रुपयांचा धनादेश कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या हस्ते देण्यात आला. ज्ञानेश्वर कारखाना आसवनी विभागातील अशोक भीमा गायकवाड व संभाजी पांडुरंग सुंबे या कामगाराचा मागील वर्षी अपघाती मृत्यू झाला होता.

कारखान्याने सर्व कामगारांसाठी अपघात विमा घेतलेला आहे. प्रत्येकी 2 लाख रूपयांचा धनादेश अलका अशोक गायकवाड व संगीता संभाजी सुंबे यांना घुले यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी संचालक शिवाजीराव कोलते, कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव मिसाळ, कामगार संचालक सुखदेव फुलारी, रवींद्र मोटे, सुनील देशमुख, दादासाहेब गंडाळ, विलासराव लोखंडे, विमा क्लेम विभागाचे हिरामण साळवे, अंकुश दाभाडे, राजू सुंबे, सतीश शिंदे, राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news