नगर : खांडगावला दोन कुटुंबात जागेवरून वाद

नगर : खांडगावला दोन कुटुंबात जागेवरून वाद

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे जागेच्या किरकोळ वादातून संगमनेर शहर पोलिसांत दोन्ही बाजूंनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील तब्बल 22 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. खांडगाव येथील राजेंद्र यादव सस्कर हे गावी गेलेले असताना शेजारील जनार्दन गोविंद गुंजाळ, संदीप चंद्रभान गुंजाळ, दत्तू तुकाराम गुंजाळ, विलास तुकाराम गुंजाळ,भानुदास देवराम गुंजाळ, बादशहा गोविंद गुंजाळ, बाबासाहेब गोविंद गुंजाळ सचिन बादशहा गुंजाळ, अमोल भानुदास गुंजाळ, संकेत बाबासाहेब गुंजाळ, शुभम बाबासाहेब गुंजाळ, नितीन सूर्यभान गुंजाळ, अजित बाबासाहेब गुंजाळ, महेश नामदेव गुंजाळ, अमित बाबासाहेब गुंजाळ व इतर चार ते पाच महिला यांनी जमाव गोळा करुन सस्कर यांच्या घराच्या शेजारील हेअर सलून दुकानाचे नुकसान केले.

तसेच बादामाचे झाड तोडले,शौचाल याच्या नळ जोडणीचीही तोडफोड केली. याशिवाय शिवीगाळ करुन हातपाय तोडू, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत राजेंद्र सस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी वरील 15 जणांसह इतर चार-पाच महिलां विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पवार हे करत आहे.

दुसर्‍या तक्रारीत याच खांडगावातील गुंजाळ यांनी दिली आहे. जर्नादन गुंजाळ हे घरा जवळ साफसफाई करत असताना राजेंद्र यादव सस्कर, संजय यादव सस्कर,सुभाष यादव सस्कर, प्रसाद संजय सस्कर, पुष्पा कमळाकर सस्कर, सुषमा राजेंद्र सस्कर, सुधाकर यादव सस्कर यांचा मुलगा नाव माहीत नाही यांनी जमाव गोळा करुन जनार्दन गुंजाळ यांची भावजय ज्योती संजय गुंजाळ व इतर सूना यांनी 'ही जागा आमची आहे, येथे काहीही करायचे नाही,' असे म्हणून शिवीगाळ करुन 'तुमच्याकडे पाहतो', असा दम दिला. याबाबत जनार्दन गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संग मनेर शहर पोलिसांनी वरील 7 जणांच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक धादवड हे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news